![]() |
Mitron_vs_Tik Tok |
भारतामध्ये शॉर्ट विडिओ बनवणाऱ्या अँप्सची Tik Tok ची लोकप्रियता खूप वाढली आहे हे पाहून भारतात आणखीन एक अँप लॉन्च झालेले आहे ते आहे Mitron. काही माध्यमातून लक्षात येते कि हे app शिवांक अग्रवाल याने बनवले आहे.
अगदी एका महिन्यातच या Mitron app ला खूप मोठी लोकप्रियता मिळालेली आहे असे दिसते. Google Play Store मध्ये पाच लाख हुन जास्त डाऊनलोड दिसते आहेत. इतकी लोकप्रियता मिळण्याचे कारण, बऱ्याच दिवसापासून चायनीज App Tik Tok चा बहिष्कार करून देशी App चा वापर करा! असा प्रचार चालू असल्याने Mitron ला हि लोकप्रियता मिळालेली आहे. पण असे करणे कितपत योग्य आहे हा संशोधनाचा भाग आहे. भारतीय लोक कोणतीही गोष्ट ऐकायला मिळाली किंवा देशी विदेशी असे भावनिक मुद्दे निर्माण केले कि लगेच भावनिक होऊन वळले जातात.
Mitron बद्दल आपण जाणून घेऊयात ;
Mitron सेम टू सेम Tik Tok सारखेच बनवले गेले आहे ज्यामध्ये आपण १५ सेकण्ड चा व्हिडीओ बनवू शकतो. हे जरी सेम टू सेम Tik Tok सारखे बनवण्याचा प्रयत्न केला असला तरी यामध्ये बऱ्याच अडचणी देखील आहेत. Mitron हे Tik Tok शी सामना करत स्पर्धेत टिकून राहील कि नाही याची शाश्वती देणे शक्य नाही. निश्चितच Tik Tok ची लोकप्रियता चांगली आहे आणि Mitron स्पर्धेत नवीन असल्याने आणि भरपूर अडचणी येत असल्याने थोडे स्पर्धेचे ठरू शकते. तसेच Mitron App हे फक्त Android OS मधेच चालते Apple OS वरती हे App काम करत नाही. अशा प्रकारे बऱ्याच अडचणी अजून Mitron मध्ये आहेत.
Mitron TV द्वारे सूचित करण्यात आलेले आहे जे Play Store मध्ये दिसेल. हे App फक्त 8Mb चे आहे . Apple Store वर हे App डाउनलोड होत नाही सपोर्ट हि करत नाही.
आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे Mitron App हि एक अज्ञात संस्था दिसते. त्याची Contact करण्याची सिस्टिम काहीशी शंकास्पद दिसते. NDTV News 18 द्वारे करण्यात आलेल्या संपर्कात असे लक्षात आले कि Mitron App ला जे Contact Details दिलेले आहेत ते Irresponsive आहेत म्हणजे तिकडून कोणत्याही प्रकारचा Response येत नाही. कॉन्टॅक्ट ई-मेल id हा Gmail चा देण्यात आलेला आहे. NDTV News 18 ने पाठवलेल्या emails चा एकही रिप्लाय मिळाले ला नाही.
No comments:
Post a Comment