भारतामध्ये सॅमसंग चे मोबाईल वापरणाऱ्यांची
खूप मोठी संख्या आहे. नेहमीच भारतीयांची सॅमसंगचे फोन किंवा कोणतेही प्रॉडक्ट घेण्यास
पसंती असते. तसा Samsung वरती विस्वासही लोकांचा आहे. आता सॅमसंग जूनच्या पहिल्याच
आठवड्यामध्ये सर्वांना परवडेल अशा किमतीमध्ये दोन स्मार्टफोन (Smartphones) लॉन्च करणार
आहे. त्यातील एका पहिल्या फोनची किंमत असेल फक्त ९ हजार रुपये. samsung Galaxy M01 या सिरीज मध्ये दोन नवीन कमी
किमतीतील फोन येत असून Galaxy M01 हा Galaxy A01 च्या तुलनेत थोडा महागडा असणार आहे.
अगदी नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार या फोन ची किंमत ९ हजार पासून पुढे असेल.
आता सर्वाना उत्सुकता लागली असेल
कि या फोनचे Configuration नेमके काय असणार आहे याबद्दल? इतक्या कमी किमतीत
samsung देत आहे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आणि या सोबत आणखीन फीचर्स. हि सिरीज
जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च करण्याचा निश्चय कंपनीने केलेला आहे.
बजेट विचारात घेऊन केलेल्या मध्ये
हा smartphone असणार आहे. तसे पाहता फोनची
वैशिष्ठे खूपच दमदार असणार आहेत असे नाही. गूगल प्ले कॉन्सोल लिस्टिंग्जनुसार या स्मार्टफोन्स
मध्ये स्नॅपड्रॅगन ४३९ चिपसेट बसवण्यात आलेला आहे. कमी किमतीमध्ये असणाऱ्या फोन मध्ये
असणारी हि चिप आता जुनी झाली आहे. तसे पाहिले तर या रेंज मध्ये आता Helio G70 यासारखे
चिपसेट मिळतातच. सॅमसंग च्या नवीन Galaxy A01 या फोनमध्ये मिळणार प्रोसेसरच यामध्ये
असणार आहे.
तसे तुलनात्मक पाहिले तर A सिरीज
च्या कमतीच्या तुलनेत या फोन्स मध्ये एक जीबी रॅम जास्त दिलेली आहे.
पाहुयात Galaxy M01 चे फीचर्स
:
गॅलेक्सी M01 मध्ये ( HD +
Display) एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये Android 10 असेल याचा अर्थ सॅमसंगचे
अजून एक मॉडेल One UI 2.1 याबरोबर हे ही येणार आहे. याचबरोबर एम सिरीज मध्ये
Galaxy M11 हा देखील स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. पण Galaxy M11 या फोन ची किमंत भारतामध्ये ३ जीबी
रॅम व ३२ जीबी स्टोरेज सोबत ११ हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
पाहुयात Galaxy M11 चे फीचर्स:
नवीन Galaxy M11 मध्ये ४ जीबी
रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात येईल. या फोनची किंमत १३ हजार रुपयेच्या आसपास असेल.
या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचचा डिस्प्ले टॉप-लेफ्ट कॉर्नर (Top Left Corner) मध्ये पंचहोल
सोबत असेल. ज्यामध्ये ८ मेगापिक्सलचा हाय कॉलीटी कॅमेरा दिला जाईल. रियर पॅनेलवर १३
मेगा पिक्सल असेल व ५ मेगापिक्सल, अल्ट्रावाईड
तसेच २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर (dept Sensor) देण्यात येईल. फोनच्या फ्रंट पॅनल
म्हणजे स्क्रीनवर फिंगरप्रिंट सेन्सर असेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी कपॅसिटी
चांगली मिळणार आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाणार आहे हि खूप चांगली गोष्ट
ग्राहकांसाठी जोडली गेलेली आहे.
लेटेस्ट फीचर्स साठी म्हणून हे मॉडेल्स खूप आकर्षक असतील तेही अगदी कमी किमतीमध्ये. ज्यांना सॅमसंग ब्रँन्ड आवडतो त्यांच्यासाठी अगदी खुशखबरीच म्हणावी लागेल. अशा फीचर्स चा आनंद घेण्याची इच्छा असेल तर जून च्या पहिल्या आठवड्या पर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल.
No comments:
Post a Comment