उत्पन्न दाखला / मिळकतीचे प्रमाणपत्र कसे काढावे तेही अगदी ३३ रुपयांमध्ये? / How to get Income Certificate In just 33 Rupees? - Marathi Way

Breaking

Economic, Mobile, Technology, Science, General Knowledge all content in marathi.

BANNER 728X90

Saturday, October 22, 2022

उत्पन्न दाखला / मिळकतीचे प्रमाणपत्र कसे काढावे तेही अगदी ३३ रुपयांमध्ये? / How to get Income Certificate In just 33 Rupees?

मुलांच्या शिक्षणासाठी असो किंवा बँक कामी असो शक्यतो तेहसीलदार यांच्या सही चे इनकम सर्टिफिकेट हे लागते. पण यासाठी आपल्याला अनेकदा तेहशील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. पण आता ऑनलाईन पद्धतीने घरातूनच आपण इनकम सर्टिफिकेट म्हणजेच मिळकतीचे प्रमाणपत्र मिळवू शकतो आणि तेही ३३ रुपयांमध्ये. फक्त यासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा हे माहिती नसल्याने आपण लक्ष देत नाही पण हे अगदी सोपे आहे.

प्रथम आपण पाहुयात यासाठी आपल्याला कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते?

१. उत्पन्नाचा दाखला तलाठी यांचा 

२. स्वतःचे आधार कार्ड झेरॉक्स कॉपी 

३. शिधापत्रिका (रेशन कार्ड) झेरॉक्स कॉपी 

४. पासपोर्ट साइज फोटो

५. स्वघोषणा पत्र

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा :


Click Here



लॉगिन झाल्यानंतर आपण महसूल विभाग →  मिळकतीचे प्रमाणपत्र यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व दिलेली माहिती भरून सबमिट या बटण वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि त्यानंतर पेमेंट करावे लागेल ३३ रुपये.

मिळकतीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा कालावधी आहे १५ दिवस. आपण वेळोवेळी पाहून आपला अर्ज मंजूर झाला आहे कि नाही पाहू शकता. मंजूर झाला असेल तर आपल्याला Download हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक करून आपण उत्पन्न दाखला pdf डाउनलोड करून घेऊन शकता.

यासाठी आपणास अधिक माहिती किंवा काही अडचणी असतील तर कंमेंट विचारू शकता आपल्याला वेळीच मदत करण्यात येईल.



No comments:

Post a Comment