![]() |
Donald_Trump_Bio |
डॉनल्ड ट्रम्प बाबतीत जाणून घ्या काही विलक्षण गोष्टी :
Donald Trump: डॉनल्ड ट्रम्प यांचा जन्म 14 जून, 1946 रोजी न्यूयॉर्क, अमेरिका मध्ये झाला. डॉनल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्रपति आहेत. राष्ट्रपती बनण्या अगोदर ते रिअल इस्टेट डेव्हलपर होते. तुम्ही जाणून थक्क व्हाल कि त्यांच्या नावे जगभरात कित्येक हॉटेल्स, गोल्फ कोर्स, केसींनो अशा प्रकारची संपत्ती आहे. आणखीन त्यांची पत्नी स्लोवेनियाई मॉडेल मेलानिया ट्रम्प ही त्यांच्या पेक्षा तब्बल २३ वर्षाने लहान आहे.
जसे कि तुम्हाला माहिती असेल डॉनल्ड ट्रम्प यांना भारताचा समर्थक मानले जाते. काही दिवसापूर्वीच डॉनल्ड ट्रम्प भारत भेटीसाठी आले होते.
डॉनल्ड ट्रम्प बद्दल व्यैयक्तिक माहिती (Personal details of Donald Trump)
पूर्ण नाव : डॉनल्ड जॉन ट्रम्प, जन्म दिनांक : 14 जून, 1946 , निवास : क्वीन्स, न्यूयॉर्क सिटी, शिक्षण (Donald Trump Education): Bsc in Economics (1968) वडील : "फ्रेड ट्रम्प" व आई "मेरी ऐनी मैकलियोड".
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी तीन झालेल्या आहेत त्या खालील प्रमाणे:
इवाना ज़ेलिनकोवका (1977-1992), मारला मेपल (1993-1999) मेलानिया नोज़ ट्रम्प (2005)
मुले : 5 (डोनाल्ड जूनियर, इवंका ट्रम्प, एरिक, टिफ़नी, बैरन)
राजकीय पार्टी (Donald Trump Political Party) : रिपब्लिकन (1987-1999, 2009-2011, 2012-सध्या)
एकूण संपत्ती (Donald Trump worth) : 3.1 बिलियन डॉलर, धर्म: ट्रम्प एक पुरोहित आहेत.
पद: अमेरिकेचे राष्ट्रपती (20 जनवरी, 2017)
१) न्यूयॉर्क मध्ये मॅनहॅटन सिटीमध्ये त्यांचे ७२ मजली घर आहे ज्याचे नाव ट्रम्प टॉवर असे ठेवलेले आहे. या घरात ट्रम्प कधीही नशा करत नाहीत ही एक विशेष गोष्ट आहे.
![]() |
Trump_Building |
2) डॉनल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे असे राष्ट्रपती आहेत ज्यांची स्वतःची बोर्ड गेम आहे. त्याचे नाव त्यांनी "Trump : The Game " असे ठेवले आहे.
3) डॉनल्ड ट्रम्प यांनी तिसरे लग्न २००५ मध्ये केले आहे. त्यांची ही सध्याची तिसरी पत्नी आहे जी त्यांच्या पेक्षा २३ वर्षाने लहान आहे .
![]() |
Donald_Trump_with_Wife |
4) ६० वर्षाच्या कालावधी मध्ये पहायला गेले तर ट्रम्प हे पहिले अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत कि जे कधीही गव्हर्नर म्हणून नियुक्त नाही झाले. बाकी इतर सर्व जे राष्ट्रपती होते ते आपल्या कार्यकीर्दीमधे गव्हर्नर झालेले आहेत.
5) ९० च्या दशकामध्ये ट्रम्प हे एक रियल इस्टेट बिजनेस मध्ये होते त्यावेळी त्यांचे यामध्ये खूप नुकसानही झाले होते. १९९२ मध्ये ट्रम्प प्लाझा ला दिवाळीखोर असे घोषित केले होते.
6) ट्रम्प ने 1999 मध्ये “रिफ़ॉर्म पार्टी” बनवली होती व राजकीय कारकीर्दचा अनुभव घेतला होता. पण पार्टीमधील आंतरिक वाद विवादामुळे फेब्रुवारी २००० मध्ये निवडणुकीतून बाहेर पडले.
![]() |
Reform_Party_New_York |
7) याचबरोबर ट्रम्प यांचा बिझनेस रियल एस्टेट शिवाय कपड्यांचा देखील आहे ज्याचे उत्पादन फक्त चीन आणि बांगलादेश मध्ये करतात कारण या देशांमधे लेबरसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत.
8) 1970 मध्ये ट्रम्प ने तोट्यात चाललेले "हॉटेल कोमोडोर" ७ कोटी रुपयाला खरेदी केले होते व नंतर १९८० मध्ये त्या हॉटेल चे नाव बदलले व "दि ग्रँड हयात" असे ठेवून सुरुवात केली.
9) ट्रम्प चे एक संगठन ज्याचे पूर्वीचे नाव "एलिजाबेथ ट्रम्प एंड सन्स" असे आहे जी एक अंतरराष्ट्रीय मिडटाउन मैनहट्टन, न्यूयॉर्क शहर मध्ये ट्रम्प टॉवर मध्ये अस्तित्वात आहे. यामध्ये डॉनल्ड ट्रम्प चे व्यापार उद्योग सुरु आहेत. ट्रम्प राष्ट्रपती होण्या अगोदर इथे काम करत होते आता त्यांचा मुलगा हे काम पाहतो आहे.
10) 1996 पासून ते 2015 पर्यंत जितके मिस युनिव्हर्स, मिस अमेरिका अशा स्पर्धांचे आयोजन झालेले आहे ते सर्व ट्रम्प यांनीच केले होते ते स्वतः त्या कार्यक्रमाचे मालक होते.
11) इतकेच नव्हे तर ट्रम्प एक खूप प्रसिद्द असे लेखक आहेत त्यांनी पन्नास पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे खालील प्रमाणे आहेत :
How to Get Rich, Time to Get Tough: Make America Great Again! Trump 101: The Way to Success, Midas Touch: Why Some Entrepreneurs Get Rich, Trump Never Give Up: How I Turned My Biggest Challenges into Success.
![]() |
Writer _ donald _Trump |
12) "The Apprentice" हा एक गेम शो आहे, हा कार्यक्रम ट्रम्प स्वतः होस्ट करत होते. या शो साठी ३.७५ डॉलर पर्यंत मानधन ट्रम्प यांनी घेतले आहे. यामध्ये ज्याला भाग घायचा असतो त्याची व्यावसायिक क्षमता पाहिली जात होती.
13) ट्रम्प यांना WWE चा खूप शौक आहे तुम्ही कधीतरी त्यांना WWE मध्ये फायटर्सना प्रोत्साहन देताना पाहिले असेलच.
तर याप्रकारे ट्रम्प यांचा जीवन प्रवास, शौक त्यांचे कामकाज याबद्दल माहिती पाहिली. अशाच रोचक आणि नव नवीन माहिती साठी "Marathi Way" सोबत जोडून रहा.
No comments:
Post a Comment