IMEI आयएमईआय नंबर काय असतो आणि आपण चोरी झालेला मोबाईल IMEI द्वारे मिळवू शकतो का? - Marathi Way

Breaking

Economic, Mobile, Technology, Science, General Knowledge all content in marathi.

BANNER 728X90

Thursday, May 28, 2020

IMEI आयएमईआय नंबर काय असतो आणि आपण चोरी झालेला मोबाईल IMEI द्वारे मिळवू शकतो का?

IMEI_LOCATION


आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरणे ओळख क्रमांक (The International Mobile Equipment Identity) IMEI हा मोबाइल फोन डिव्हाइस ओळखण्यासाठी डिव्हाइस ओळख क्रमांक असतो, हा प्रत्येक डिवाइसला वेगवेगळा दिलेला असतो जेणेकरून निश्चित उपकरण ओळखायला मदत होईल. IMEI आयएमईआय नंबरमध्ये त्या मोबाइलशी डिवाइसशी संबंधित जवळजवळ सर्व माहिती असते. मोबाईल मध्ये IMEI नंबर पाहण्यासाठी आपल्या फोनवरून * # 06 # डायल करून मिळवू शकता.

IMEI नंबर जीएसएम (GSM), सीडीएमए (CDMA) आणि आयडीएन (IDAN) आणि काही (Satelite Phone) उपग्रह फोनमध्ये देखील असतो. IMEI नंबर हा 15 अंकी असतो (केंव्हा केंव्हा 16 आणि 17 अंक देखील असतात), हा नंबर असेल तर त्यामध्ये फोन डिव्हाइसचे मॉडेल, त्याचे स्थान आणि मोबाइल (डिव्हाइस) चे अनुक्रमांक याबद्दल आपल्याला माहिती मिळते.

काही आकडेवारीनुसार, भारतामध्ये सुमारे 20 लाख लोक IMEI आयएमईआय नंबरशिवाय मोबाइल फोन वापरत होते. यामुळे चुकीच्या गोष्टी घडू नयेत म्हणून बनावट आयएमईआयसह व त्याशिवाय मोबाइल फोन 30 नोव्हेंबर 2009 रोजी पासून बंद करण्यात आले.

IMEI_Code

IMEI नंबर मुळे व्यक्ती कोणत्या स्थळी आहे ते ओळखता येते. समजा एखाद्याचा फोन हरवला आणि त्या व्यक्तीला जर आपला फोन कुठे आहे ते शोधायचे असेल तर त्या फोन चे लोकेशन ट्रेस करता येते. पण यासाठी त्या मोबाईलचा IMEI आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर IMEI कुठे असतो किंवा तो कसा जाणून घ्यावा याबद्दल माहिती नसेल तर हे लक्षात ठेवा. IMEI नंबर हा बॅटरी काढल्यावर त्याखाली १५ अंकी IMEI असे लिहिलेला असतो. आणखी दुसऱ्या पर्यायाने पाहायचे असेल तर आपल्या फोन मध्ये *#०६# असे डायल केल्यावर मोबाईल स्क्रीन वर IMEI दिसेल तो नंबर आपण आपल्याकडे नोंद करून ठेवू शकता.

IMEI नंबरचे फायदे :
* IMEI नंबरचा वापर गुन्हेगारांना पकडण्यासाठी केला जातो.
* कोणाचाही फोन चोरीस गेल्यास तो फोन IMEI च्या साहाय्याने ट्रेस करून चोरास पकडता येते.

Code_stressing

IMEI नंबर कसा बनतो ?

IMEI नंबर मध्ये डिवाइस सिरीयल, मॉडेल आणि उत्पादक च्या विषयी माहिती असते.  IMEI/SV ची संरचना  3GPP TS 23.003 अशा स्वरूपात मांडणी केलेली असते. IMEI चे पहिले अंक डिवाइसच्या लोकेशन बद्दल असतात जे (TAK) ने ओळखले जातात. या नंतर कंपनीकडून निर्धारित सिरीयल नंबर असतो ज्यामध्ये मॉडेल बद्दल माहिती असते. जसे कि मॉडेल नंबर, उत्पादन तारीख इत्यादी.

IMEI चा दिशानिर्देशानुसार "ल्युह्ण एल्गोरिथम" (Luhn check digit) गणना प्रणाली च्या द्वारे केला जातो.

उदा: मोबाईल चा IMEI नंबर आहे ४९०१५४४०३८५४८२३ तर  यातील पहिले अंक जसे कि ४९०१५४४० हे "टाईप अलोकेशन कोड" (TAC) असतात, त्यानंतर अंक ३८५४८२ उत्पादक कंपनी द्वारे प्रविष्ट सीरिअल नंबर असतो. आणि शेवटचा अंक तो "ल्युह्ण एल्गोरिथम" (Luhn check digit) असतो अशाप्रकारे तीन भाग मिळून हा नंबर तयार केला जातो :

1. उजव्या बाजूने प्रत्येक दोन नंबर एकाला दुप्पट केले असते (उदा. --- १२).
2. अंक असे जोडले जातात (उदा. १२ + ).
3. अंकाचे योग हे १० ने विभाजित आहेत कि नाही याची देखील पडताळणी केली जाते.

उदा.
IMEI
1
8
3
0
3
5
2
0
4
3
2
8
3
4
 ?
Double every other
2
16
6
0
6
10
4
0
8
6
4
16
6
8
8
Sum digits
2 + (1 + 6) + 6 + 0 + 6 + 8 +(1+0)+4 + 0 + 8 + 6 + 4 + (1 + 6) + 6 + 8 + ? = 74 + ?

वेगवेगळ्या देशांचे IMEI नंबर :

   IMEI DIGITS
              Country
          QUALITY
        01 or 10
                Finland
          Very Good
              02 or 20
                 China
                Low
              08 or 80
               Germany
                Fair
                   03
          France - Canada
                Best
                   04
               Canada
    Best Limited Edition
                   00
         Original Factory
               Best
                   13
             Azerbaijan
           Very Bad

वरील सर्व माहितीवरून लक्षात आले असेल कि IMEI नंबर हा अतिशय महत्वाचा माहितीचा संग्रह आहे यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यास मदत होते.



No comments:

Post a Comment