जर कोणी ही coin नाणी घेण्यास नकार देत असेल तर त्यांच्यावर होऊ शकते कारवाई! - Marathi Way

Breaking

Economic, Mobile, Technology, Science, General Knowledge all content in marathi.

BANNER 728X90

Monday, May 25, 2020

जर कोणी ही coin नाणी घेण्यास नकार देत असेल तर त्यांच्यावर होऊ शकते कारवाई!

Old-Coins-chalan


भारतात नाणी coin बनवण्याचे काम नाणे अधिनियम, २०११ नुसार केले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नोट्स छपाई करण्याचे काम असते; भारतीय रिझर्व बँक अधिनियम, १९३४ च्या तरतुदीनुसार, नाणी वित्त मंत्रालय बनवते. हा कायदा २०११ नाणी कायदाद्यानुसार जम्मू-काश्मीरसह संपूर्ण भारतभर   लागू आहे. भारत मध्ये बरेच लोक बरेच दुकानदार नाणी घेण्यास नकार देत असतात. नाणी घेण्यास नाकारणे हा गुन्हा आहे कि नाही आपण पाहुयात.

खरेतर, रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालयातूंन तसेच देशभरातून ऐकायला मिळत आहे की, दुकानदार, ग्राहक याचबरोबर बँकाही नाणी घेण्यास नकार देत आहेत. पण कोणाला माहिती नसल्याने ते नकळत एक गुन्हाच करत आहेत. असे करणे म्हणजे एक गुन्हाच करणे असे आहे.

भारतातील सर्वोच्च वित्तीय संस्थामध्ये "रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया" ही भारतातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. Indian Reserve Bank of India ला 2 ते 10,000 रुपयांच्या नोटा छापण्यास अधिकृत केले गेले आहे. पण एक रुपयाची नोट आरबीआयऐवजी वित्त मंत्रालयाने छापली आहे आणि त्या नोटेवर भारतीय गव्हर्नरची सही नसून वित्त सचिवाची सही आहे.
 ============================================================
See Also : 

२०२० चे आर्थिक पॅकेज MSME ला फायद्याचे आहे कि नाही पहा !


=============================================================

नाणी कायदा २०११: नुसार coin नाण्यांसोबत आपण काय करू शकत नाही ते पाहुयात :

जर एखाद्या व्यक्तीने प्रचलित असणारे नाणे घेण्यास नकार दिला तर त्याच्याविरुद्ध एफआयआर ही दाखल करता येते. त्या व्यक्ती किंवा संस्थांवर भारतीय चलन अधिनियम आणि आयपीसीच्या कलमांनुसार कारवाई केली जाईल. याचबरोबर अशी तक्रार रिझर्व्ह बँकेकडेदेखील करता येईल.

नाणे Coin न घेतल्यामुळे होणारी शिक्षा व दंड :

सिक्का कायदा २०११ धारा ६ च्या कलम अन्वये रिझर्व्ह बँकेने जारी केलेली नाणी देण्यासाठी वैध चलन असावी ती बनावट नसावीत.

भारतीय दंड संहितेच्या कलम ४८९ अ ते ४८९ई अंतर्गत नोट्स किंवा नाणी छापणे, नोट्स किंवा नाणी खोटे ठरविणे आणि योग्य नाणी घेण्यास नकार देणे हा गुन्हा आहे. या कलमांतर्गत कोर्ट आर्थिक दंड, तुरुंगवास किंवा दोन्ही अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.

जर तुम्ही एखादी व्यक्ती वैध नाणे घेण्यास नकार देत असेल तर या प्रसंगाचा विडिओ करून ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्यास पोलिसांना त्या व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदवून घ्यावीच लागते.

अफवा पसरवणे व त्यासाठीची शिक्षा:

अगदी खरे असलेले नाणे कोणी खोटे असल्याची अफवा पसरवत असेल तर त्याला शिक्षा होऊ शकते अशी तरतूद आहे. आरबीआयच्या नियमांव्यतिरिक्त कोणी अफवा पसरवणे गुन्हा आहे, अशा व्यक्तीवर  आयपीसीच्या कलम ५०५ अंतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. तसेच 3 ते ७ वर्षांची शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे.

कोणती नाणी बंद आहेत :

भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने ३० जून २०११ पासून अगदी कमी किमतीची नाणी बंद केलेली आहेत. जसे कि १ पैसे, २ पैसे, ५ पैसे, १० पैसे, २० पैसे व २५ पैसे. अशी नाणी घेण्यास कोणी नकार दिला तर तो योग्य आहे. पण या व्यतिरिक्त नाण्याबद्दल कोणी नकार देत असेल तर तक्रार दाखल होऊ शकते.
Old-Coins-20Paisa

टीप: सर्वांनी लक्षात ठेवावे कि ५० पैसे अजूनही भारतामध्ये वैध नाणे आहे, ५० पैशाचे नाणे घेण्यास कोणी नकार देत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

आता तुमच्या लक्षात आले असेलच कि भारत सरकारने जरी केलेल्या आदेशा व्यतिरिक्त कोणी नाणी घेण्यास नकार देत असेल तर तो व्यक्ती किंवा संस्था सरकारच्या आदेशाचे पालन करत नाही. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

No comments:

Post a Comment