पॅन कार्ड फ्री मध्ये कसे काढावे ते शिका? How to get free pan card instantly! - Marathi Way

Breaking

Economic, Mobile, Technology, Science, General Knowledge all content in marathi.

BANNER 728X90

Monday, June 1, 2020

पॅन कार्ड फ्री मध्ये कसे काढावे ते शिका? How to get free pan card instantly!

E_Pan_Card_Adhaar_Card

(e-pan card) इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड प्रक्रिया भारतात सुरू करण्यात आलेली आहे, ही एक पेपरलेस सुविधा आहे जी आयकर विभागामार्फत जारी करण्यात आलेली आहे. इन्स्टंट पॅन (Instant Pan Service) ही सुविधा 28 मेपासून सुरू करण्यात आली आहे. त्याचे 'बीटा व्हर्जन' फेब्रुवारीपासून प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइटवर उपलब्ध आहे.  जर आपणास हे इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड हवे असेल तर आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर आधारकार्डशी मोबाईल नंबर उपडेट असणे अनिवार्य आहे.

भारतामध्ये जवळपास प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी वा इतर कोणत्याही सेवा वापरण्यासाठी आधार व पॅनकार्ड अनिवार्य केले गेले आहे. देशात आधार क्रमांक आणि पॅनकार्ड हे कंपलसरी करण्यात आलेले आहे.

परंतु सध्या देशातील बर्‍याच लोकांकडे (Pan Card) पॅनकार्ड नाही, यामुळे त्यांना बँकांमध्ये खाती उघडण्यास आणि आर्थिक व्यवहार करण्यास त्यांना खूप अडचणी येत आहेत.

या अगोदर जर लोकांना पॅनकार्ड काढायचे असेल तर त्यासाठी प्रोसेस खूप अवघड होती. कोण्या एजन्टकडे पॅनकार्ड काढण्यास द्यायचे व ते नंतर दोन आठवड्यांत पोस्टच्या माध्यमातून येण्यास थांबावे लागायचे. पण आता लोकांना या सर्व प्रकारातून जाण्याची गरज नाही. आता ई पॅन कार्ड तत्काळ उपलब्ध होईल.

ईपॅन कार्ड सेवा (ईपॅन कार्ड लॉन्च): -

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात आता सुरुवात करण्यात आलेल्या पॅन क्रमांकाची सेवा तातडीने सुरू करण्याची घोषणा केली. ज्यांना त्वरित ईपॅन कार्ड हवे आहे ते वित्त मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. त्याचा तपशील भरल्यानंतर ही सुविधा रिअल टाइम तत्त्वावर उपलब्ध होईल.

ईपॅन कार्ड ही प्रक्रिया पेपरलेस असून इलेक्ट्रॉनिक पॅन (ई-पॅन) प्राप्तिकर विभागाकडून विनामूल्य दिले जाते. इन्स्टंट पॅन सुविधा ही सुविधा 28-05-2020 पासून सुरू करण्यात आली आहे. त्याचे 'बीटा व्हर्जन' फेब्रुवारीपासून प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइटवर उपलब्ध आहे.

E_Pan_Service


ईपॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे: -

१. यासाठी सर्व अर्जदारांकडे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.
२. तुमचा संपर्क क्रमांक (Mobile Number) आधार कार्डशी लिंक केलेला असला पाहिजे.

टीपः ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही त्यांना या सेवेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर जर कोणाकडे आधार नंबर असेल पण आधारशी (Mobile number) संपर्क क्रमांक आधारशी लिंक नसेल तर त्याला या इन्स्टंट ईपॅन कार्ड सेवेचा लाभ मिळणार नाही.

ईपॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा (इन्स्टंट ई पॅन कार्ड कसे मिळू शकेल): -


e-Pan साठी अर्ज करणार असाल तर खूप सोपी प्रक्रिया आहे. आयकर विभागाच्या e-filing ई-फाईलिंग वेबसाइटवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) जा, आपला आधार क्रमांक टाका, त्यानंतर तुमच्या मोबाईल वर ओटीपी येईल. फॉर्ममध्ये सर्व माहिती व ओटीपी भरा आणि त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला  १५ अंकी पावती नंबर  मिळेल. त्या नंबर द्वारे तुम्हाला ई-पॅन कार्ड वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल. जर तुमच्या आधार कार्ड शी तुमचा ई-मेल उपडेट असेल तर तुमच्या इमेल आयडी वर देखील e-pan कॉपी पाठवली जाईल. 

या ईपॅन कार्डला तितकेच महत्व आहे जितके हार्ड कॉपी पॅनला महत्त्व आहे. आपण आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून  ते  कायमचे जतन करून ठेवू शकता.

हे लक्षात ठेवा की भारत सरकारने 30 जून 2020 पर्यंत पॅन कार्डांना आधारशी जोडणे बंधनकारक केले आहे. आत्ता आयकर विभागाने सर्व प्राप्तिकर भरणा त्यांनी त्यांचा आधार क्रमांक पॅनच्या बदल्यात वापरण्याची परवानगी दिलेली आहे. 

टिप : Pan Card संबंधी कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर कमेंट करा निश्चित मदत केली जाईल;

कंपनीच्या परवानगी शिवाय PF withdraw कसा करावा ? How to withdraw pf without company's permission?

No comments:

Post a Comment