स्मार्टफोन मुळे होणारे गंभीर परिणाम पाहून तुम्हीही व्हा सावध ! use smartphones with smartness !! - Marathi Way

Breaking

Economic, Mobile, Technology, Science, General Knowledge all content in marathi.

BANNER 728X90

Wednesday, May 20, 2020

स्मार्टफोन मुळे होणारे गंभीर परिणाम पाहून तुम्हीही व्हा सावध ! use smartphones with smartness !!

smartphones user
Smartphone Addiction

ध्या सर्वच लोक स्मार्टफोन वापरत आहेत. आधुनिक जग इतके व्यस्त होत चाललेले असूनही  दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढतच चालला आहे.  तसे पाहिले गेले तर लोक या छोट्याश्या डिवाइसच्या मदतीने एकमेकांशी संलग्न झालेले आहेत. इतकेच नव्हे तर स्मार्टफोन हा मनोरंजनाचा खूप मोठा स्रोत झाला आहे. स्मार्टफोन चे जितके फायदे आहेत त्यापेक्षाही जास्त त्याचे तोटे निर्माण झालेले आहेत. शॉपिंग करणे, पिक्चर तिकीट काढणे, प्रवासाचे तिकीट काढणे, इतर बऱ्याच प्रकारची बिले घरी बसून लोक पे करत आहेत. यामुळे माणूस खूपच आळशी आणि निष्क्रिय होत चालला आहे. इतकेच नव्हे तर पुस्तके, अलार्म असणारी घड्याळे, कॅमेरा तसेच नोटपॅड अशी बरीच साधने मोबाईल मध्ये बंद झाली आहेत.
वास्तव स्थिती अशी आहे कि घरामध्ये जितके लोक राहतात त्यापेक्षा घरात स्मार्टफोन जास्त आहेत. स्मार्टफोन शिवाय लोकांची जीवनगाथाच जणू अधुरी आहे असे दिसते. स्मार्टफोन गरजे बरोबरच सवय बनला आहे. 
आज आपण पाहुयात स्मार्टफोनचे फायदे आणि तोटे काय आहेत ते. आणि जर आपण गरजेपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरात असाल तर तुम्हाला या गोष्टी समजून घेतल्याचं पाहिजेत. 
तर पाहुयात फायदे आणि तोटे :

Smartphones light effects on brain 
स्मार्टफोन मधून निघणारी लाईट म्हणजेच प्रकाश हा किती आरोग्यास घातक आहे याचा तुम्ही विचार देखील केला नसेल.
तर चला तर मग पाहुयात स्मार्टफोन मधून निघणारा प्रकाश लाईट शरीरासाठी किती घातक आहे ते.
आपले शरीर सामान्यतः एका चक्राचा वापर करते जसे कि आपल्याला दिवसा जागणे आणि सतर्क राहण्याची संमती देते आणि रात्री झोपण्याचे संकेत देत असते म्हणजेच रात्री आराम करण्यास सांगत असते. यामुळेच आपण जेंव्हा बेडवर झोपायला जातो तेंव्हा स्मार्टफोन घेतो त्यातून निघणाऱ्या लाइटमुळे आपला मेंदू गोंधळून जातो. कारण रात्रीचे आपला मेंदू मेलॅटोनीन हार्मोन्स निर्माण करत असतो. हे हार्मोन्स आपल्याला झोपण्याचे संकेत देत असतात. त्यामुळे स्मार्टफोन च्या लाईटमुळे मेंदूला हे हार्मोन्स निर्माण करण्यास अडथळा निर्माण होतो आणि यामुळेच निद्रा नाश होतो व अनेक प्रकारचे आजार आपल्याला जडायला लागतात.

Sleep Needed


 १. झोप पुरी न होणे हे कारण जर जास्त दिवस टिकून राहिले तर आपल्या शरीरात न्यूरोटॉक्सिन तयार होऊ शकतात, ज्यामुळे चांगली झोप घेणे हे आणखीन कठीण होऊ जाते. यामुळे इन्सोम्निया नावाचा आजार होऊ शकतो.

२. स्मार्टफोनमुळे रात्रीची झोप खराब होते त्यामुळे दिवस कोणतेही नवीन काम शिकणे अवघड होऊ शकते, कारण यासाठी आपला मेंदू थकलेला असतो. तुम्हाला थकवा जाणवू लागतो. 
३. मेलॅटोनीन हार्मोन्स निर्माण करू शकत नसल्याने याचा परिणाम इतर हार्मोन्स वर देखील पडायला लागतो. यामुळे भूकेवर परिणाम होऊ शकतो भूक लागण्याचे नियंत्रण हे आपल्याला मेंदूद्वारेच मिळत असते. मग वजन वाढणे अशा प्रकारच्या समस्या देखील उद्भवतात.
४. झोपेचे चक्र बिघडल्याने डोके दुखी, गोंधळणे, अनेक त्रास निर्माण होतात आणि स्मरण शक्ती वर देखील परिणाम होतो.
५. एका रिसर्च मध्ये लक्षात आले आले आहे कि, टॉयलेट सीट वर जितके बॅक्टरीया असतात त्यापेक्षा जास्त बॅक्टरीया आपल्या मोबाईलवर असतात. तेंव्हा विचार करा आपण तुम्ही खाताना देखील स्मार्टफोन चा वापर किती करता आणि त्यावेळी फोन हाताळण्याने किती बॅक्टरीया आपल्या शरीरात जात असतील.
६.  स्मार्टफोन च्या वापराने मेंदूमध्ये मेलॅटोनीन व्यवस्थित काम न केल्याने आपण डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो.
७.  स्मार्टफोनचा आपल्या झोपेवर परिणाम होतो यामुळे महिलांवर देखील खूप मोठा परिणाम होतो जसे कि ब्रेस्ट कॅन्सर होणे इत्यादी.
८. स्मार्टफोनची ब्लु लाईट पडल्याने डोळ्यातील रेटिना डॅमेज करू शकते. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना अंधारात देखील स्मार्टफोन वापरण्याची सवय असते यामुळे डोळ्यावर भयानक परिणाम होतात.
९. आपण म्हणतो कि जग हे स्मार्टफोन आणि इंटरनेट मुळे जागतिक खेडे बनले आहे. पण स्मार्टफोनने लोकांना वेगळे केले आहे. आपण लोकांना प्रत्यक्ष भेटण्यपेक्स सोशल मीडियावरून चाट करून सर्व गोष्टी शेअर करत असतो. यामुळे चॅटिंग मध्ये देखील लोक खूप व्यस्त असतात.


१०. तुम्हाला नामोफोबिया बद्दल माहित आहे का? नामोफोबीया म्हणजे मोबाईल हरवल्यावर किंवा सिग्नल नसल्यावर मनाची जी अवस्था होते त्याला नामोफोबिया असे म्हणतात. मोबाईल हरवला तर सर्वानाच खूपच अधुरे अधुरे असे वाटते त्यामुळे मोबाईल नासाने म्हणजे नाराजीचे वातावरण निर्माण होते. इतकेच नव्हे तर मोबाईल मधून निघणारे रेडिएशन्स शरीरास खूप हानिकारक असतात.
 यामुळे मोबाईलचा योग्य आणि नियंत्रित मोजका वापर करणे खूप गरजेचे आहे. तरच आपले स्वास्थ्य आणि आपण सुरक्षित राहू!



No comments:

Post a Comment