आपल्या सर्वांनाच माहिती आहे
नोकिया (Nokia) कंपनी बद्दल, पूर्वी
या कंपनीची काय
क्रेज होती हे
देखील सर्वांना माहिती
आहे. नोकिया ने
सुरवातीला ११०० व
६६०० हि मॉडेल्स
बाजारात आणून खूप
धूम माजवली होती.
त्यावेळेस सर्वच जण फक्त
नोकिया कंपनीच्या मोबाईलवर भरोसा
आणि प्रेम देखील
करायचे. पण कालांतराने
यात बदल होत
गेला अनेक कंपन्या
स्पर्धेत उतरल्या आणि नोकिया
हळू हळू मागे
पडू लागली.
पण आता बऱ्याच
कालांतराने नोकिया ने आपल्या
नावे विक्रम केला
आहे. नोकिया हि
फिनलंडची टेक कंपनी
आहे. या कंपनीने
5G नेटवर्क ओव्हर
दि एअर सर्वात
फास्ट नेटवर्क मिळवल्याचा
दावा केला आहे.
नोकिया ला टेक्सस
आणि डल्लास या
शहरात सर्वात फास्ट
5G नेटवर्क मिळालेले
आहे.
कंपनीने 5G सॉफ्टवेअर
आणि हार्डवेअर च्या
मदतीने 5G स्पीड
ची चाचणी घेतली.
त्यावेळी हे स्पीड
४.७ जिबीपीएस
(GBPS) पर्यंत मिळाले. यावेळेस
कंपनीने ८०० मेगाहर्टझ
कमर्शिअल मिलीमीटर वेव्हस 5G
स्पेक्ट्रम आणि ड्युअल
कनेक्टिव्हिटी च्या मदतीने
दोन्ही एअरएंटर फेस या
दोन्ही तंत्रज्ञानावर डेटा ट्रान्स्मिट
केला जाऊ शकतो
याची पाहणी केली.
याचाच अर्थ कि
5G स्पीड आणि
LTE च्या मदतीने आपण ग्राहकांना
हि सेवा देऊ
शकतो हे सिद्ध
झाले.
5G च्या
मदतीने हाय स्पीड
डिव्हायसेस मधून अजूनपर्यंत
मिळालेले नाही आहे.
ग्राहकांना हि सुविधा
मिळवण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु
आहेत. लवकरच 5G
स्पेक्ट्रम मध्ये आणि याला
अनुसरून असणाऱ्या हार्डवेअर मध्ये
सुधारणा करून ग्राहकांसाठी
हि सुविधा पुरविली
जाणार आहे. या
विषयीचे रिपोर्ट देताना कंपनीने
म्हंटले आहे कि,
पूर्वी 4G स्पीड
सवेच्या तुलनेत 5G सेवा
ही दहा पटीने
फास्ट असू शकते.
म्हणजे 5G स्पीडच्या
व संबंधित तयार
करण्यात येणाऱ्या हार्डवेअर च्या
मदतीने १० जिबीपीएस
च्या स्पीड ची
सेवा देण्यात येईल.
![]() |
5G Technology |
या अगोदर म्हणजे गेल्या
वर्षी हुंवाई या
कंपनीने 5G स्पीड
चा नवा विक्रम
केल्याचा दावा केला
होता. पण या
चाचणी वेळी त्यांना
२.९६ जिबीपीएस
स्पीड मिळाले होते.
असेच अनेक टेलिकॉम
कंपन्याकडून स्पीड ची टेस्ट
करण्यात आली होती.
परंतु आतापर्यंत 5G
स्पीड ची चाचणी
जितक्या घेण्यात आल्या त्यामध्ये
सर्वात जास्त नोकिया कंपनीला
जास्त स्पीड घेण्यात
यश मिळालेले आहे.
नोकिया ने वापरलेले
हे तंत्रज्ञान खूपच वेगळे
असल्याचा दावा केला
आहे. यामध्ये ऑपरेटर्स
ग्लोबल 5G स्पेक्ट्रम
असेट्सचा वापर करण्यात
आलेला आहे. असे
नोकिया ने या
रिपोर्ट्स मध्ये नमूद केले
आहे.
नोकिया ने आजवर
नवीन टेक्नॉलॉजिचा वापर
न केल्याने मागे
पडली होती पण
आता या नवीन
टेक्नॉलॉजीचा शोध घेत
परत एकदा सर्वांना
थक्क करून सोडले
आहे.
No comments:
Post a Comment